गोल पोस्ट इतर औरंगाबादच्या विमानतळावर उतरताच अजित पवार थेट सिग्मा रुग्णालयात पोहचले

औरंगाबादच्या विमानतळावर उतरताच अजित पवार थेट सिग्मा रुग्णालयात पोहचले

मराठवाडा (औरंगाबाद ), ११ जानेवारी २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, अजित पवार यांनी विमानतळावरून थेट सिग्मा हॉस्पिटलकडे गाठले. दौऱ्याच्या वेळापत्रकात नसतानाही अजित पवार हे प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर झालेला प्राण घातक हल्ल्याची चौकशी तथा भेट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केेली.

३१ डिसेंबर रोजी भाऊसाहेब तरमळे यांच्यावर ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान, प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तरमळे यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज अजित पवार औरंगाबाद येथे आले असता, त्यांनी भाऊसाहेब तरमळे यांची दवाखान्यात जावून भेट घेत, तब्येतीची विचारपूस केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विनोद धानले

error: Content is protected !!
Exit mobile version