गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट विजय पाटील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी

विजय पाटील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी

मुंबई:मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. विजय पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.संजय नाईक यांची सचिवपदी तर अमोल काळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. साहलम शेख हे सहसचिव आणि जगदीश आर्चेकर हे खजिनदार असणार आहेत. युनायटेड फॉर चेंज या प्रतिस्पर्धी गटाकडूनदेखील पाटील यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा मिळाला.दरम्यान, विजय पाटील यांना माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र परस्पर हितसंबंध जोपासण्याचा मार्ग आडवा येत असल्याने संदीप पाटील यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार होती. 
 

error: Content is protected !!
Exit mobile version