गोल पोस्ट इतर राजकारण पुरंदर मध्ये १२ ग्रामपंचायती बिनविरोध

पुरंदर मध्ये १२ ग्रामपंचायती बिनविरोध

पुरंदर, ५ जानेवारी २०२१: पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करा असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पुरंदर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहेत.

पुरंदर तालुक्यातील जेऊर, खानवडी, पिसे, नाझरे सुपे, लपतळवाडी, देवडी, तक्रारवाडी, मांढर, भिवरी, बोपगाव, पानवडी, नायगाव या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्येइतकेच अर्ज प्राप्त झालेले आहेत. याबाबतची माहिती पुरंदरच्या निवडणूक विभागाने दिली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

तसेच पिंगोरी येथील सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. याबाबत पिंगोरीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला आजपर्यंत कोणतेही निवेदन दिलेले नाही.
वरील दोन्हीबाबत  मा. राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करणेत येणार असल्याचे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version