गोल पोस्ट महाराष्ट्र माणगांव मोर्बा येथून २० वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

माणगांव मोर्बा येथून २० वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

माणगांव, २५ जानेवारी २०२४ : माणगांव तालुक्यातील मोर्बा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सुर्ले गावातील २० वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

सानिया जावेद गुलेगुड (रा. पवारवाडी सुर्ले) ही महिला २३ जानेवारीला सायंकाळी ४ वाजल्यापासून आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली आणि ती परत आली नाही. त्यामुळे जावेद गुलेगुड या तिच्या पतीने माणगांव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. या घटनेची नोंद मनुष्य मिसिंग रजी. नं ६/२०२४ महाराष्ट्र प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर करीत आहेत.

दाखल गुन्ह्याप्रमाणे बेपत्ता महिला सानिया गुलेगुड हिचे वर्णन; वय वर्ष २०, उंची अंदाजे ५ फूट, मध्यम बांधा, रंग निमगोरा, अंगात पांढऱ्या रंगाचा कुर्ता, काळा पायजमा, त्यावर काळ्या रंगाचा बुरखा, हातात पांढऱ्या रंगाची बांगडी असे आहे. सदर वर्णनाची महिला कोणाला कुठेही आढळून आल्यास त्यांनी माणगांव पोलीस ठाणे फोन नंबर ०२१४०-२६३००५ यावर संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन माणगांव पोलिसांकडून करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version