गोल पोस्ट आरोग्य पुणे विभागातील २४३ रुग्ण बरे होऊन घरी : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील २४३ रुग्ण बरे होऊन घरी : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.२८ एप्रिल २०२० : पुणे विभागातील २४३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १हजार ५६३ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण १हजार २३१ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५३ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात १ हजार ५६३ बाधित रुग्ण असून ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात १ हजार ४२३ बाधीत रुग्ण असून ८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात ३५ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झालाआहे. सोलापूर जिल्हयात ६५ बाधीत रुग्ण असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २९ बाधीत रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात ११ बाधीत रुग्ण आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकुण १६ हजार ६७० नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १५ हजार ७०६ चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी १४ हजार १६२ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ५६३ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील ५७ लाख १५ हजार ३६० घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत २ कोटी १७ लाख ८८ हजार ६१७ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी १ हजार २७४ व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version