गोल पोस्ट इतर माहिती २६ जानेवारीला मुंबई पोलीस दिसणार घोड्यावर

२६ जानेवारीला मुंबई पोलीस दिसणार घोड्यावर

मुंबई :ब्रिटिश काळामध्ये पोलीस गस्त घालण्यासाठी घोड्यांचा वापर केला जायचा. कालांतराने पोलिसांची ही अश्ववारी बंद झाली. त्यानंतर त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चारचाकी देण्यात आल्या. मात्र, पुन्हा एकदा मुंबईची शान असलेले अश्वदल आता पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवरून फिरताना दिसणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी देशमुख म्हणाले की, तब्बल ८८ वर्षानंतर मुबंई पोलीस पुन्हा एकदा अश्वदल सक्रिय करणार आहेत. मुंबई पोलीस दलात येत्या २६ जानेवारीपासून अश्वदल पुन्हा कार्यरत केले जाणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वाराचे प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या दलाकडे मोर्चे, आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी देखील सोपविली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर रात्रगस्त व पेट्रोलिंग करण्याचे कामही या दलाकडून करुन घेण्यात येणार आहे.
पोलिसांच्या अश्वदलामध्ये ३० घोडे असून प्रत्येकी एक फौजदार व सहाय्यक फौजदार असतील. तर ४ हवालदार व ३२ कॉन्स्टेबलचा समावेश असणार आहे. फौजदाराकडून या दलाच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version