गोल पोस्ट इतर माहिती मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन पिंपरी चिंचवडला

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन पिंपरी चिंचवडला

पिंपरी चिंचवड, २७ ऑक्टोबर २०२२ : मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे १९ व २० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. सध्या याची जोरदार तयारी सुरू आहे. याचा आढावा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.

पिंपरी चिंचवड येथे महानगरपालिकेतील पत्रकार कक्षामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषदेचे संघटक सुनील वाळुंज व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी तयारीचा आढावा घेतला.

यावेळी पुणे विभागीय सचिव अरुण कांबळे, मराठी पत्रकार परिषदेचे निवडणूक विभाग प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, जिल्हा प्रतिनिधी अनिल भालेराव, समन्वयक अविनाश आदक व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या पदाधिकारी, सदस्य यांनी पूर्वतयारीचा संपूर्ण आराखडा सादर केला.

पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू असून सर्व तयारी अंतिम टप्प्यांत आली आहे. अधिवेशनाला राज्यातील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक आणि राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version