गोल पोस्ट क्रीडा ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आज उदघाटन

६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आज उदघाटन

पुणे : बालेवाडी क्रीडा संकुल येथे “६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पदकांचे अनावरण गुरुवारी ( दि. २) रोजी परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे ६३ व्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पहिलवान, पंच, प्रशिक्षकांच्या वर्दळीने क्रीडा संकुलात नवचैतन्य संचारले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे व श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, संग्राम थोपटे, सुनील शेळके, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, सहसंचालक जयप्रकाश दुबळे, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवडीचे उपसंचालक आनंद व्यन्केश्वर, क्रीडा व युवक सेवा मुख्यालयाचे उपसंचालक सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आदि उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version