गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे खग्रास चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला रात्री ९ पासून भारतात दिसणार

खग्रास चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला रात्री ९ पासून भारतात दिसणार

७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भारतात अद्भुत खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे. या ग्रहणाची सुरुवात रात्री ९ वाजून ५७ मिनिटांपासून होईल आणि एकूण १ तास २३ मिनिटे खग्रास अवस्थेत राहील.

  • रात्री ११ वाजता चंद्रबिंब पूर्णपणे झाकले जाईल.
  • मध्यरात्री १२ वाजून २३ मिनिटांनंतर चंद्रकोर पुन्हा दिसायला लागेल.
  • ग्रहण पूर्णपणे मध्यरात्री १ वाजून २७ मिनिटांनंतर संपेल.

ग्रहणाचे वेध दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून सुरू होतील. या काळात देवपूजा, जप आणि श्राद्ध यांसारखी नित्यकर्मे करता येतील, असे पंचांगकर्ता मोहन दाते यांनी सांगितले.

यापूर्वी असे चंद्रग्रहण १६ सप्टेंबर १९९७ रोजी आले होते. तसेच, गणेश विसर्जन मिरवणुका रात्री ९ पूर्वी संपवण्याचे पंचांगकर्त्यांचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version