पुणे, दि.३१मे २०२०: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद करण्यात आले आहे.मात्र पोलीस, डॉक्टर, शासकीय कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त आणखी एक घटक जो कोरोनाच्या काळात पोलिसांच्या सोबतीने कोरोना योध्दा म्हणून लढत आहे. तो म्हणजे सुरक्षारक्षक.
कोरोनाच्या काळात कोरोनाशी लढताना आतापर्यंत पाच सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र या मृत पावलेल्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५०लाख रुपयांचा विमा देण्यात यावा, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात येत आहे.
माया हजारे, मधुसूदन चव्हाण, संजय खडसडे,सुनील नरवणकर, सचिन जाधव या मुंबईतील जिल्हा सुरक्षरक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तरी या सुरक्षा रक्षकांना शासनाने लवकरात लवकर विमा मंजूर करावा अशी मागणी सुरक्षारक्षक महासंघ संलग्न तसेच भारतीय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ऍड. विशाल मोहिते, मारुती झाडे यांनी केली आहे.
सध्या कोरोनाच्या काळात सुरक्षारक्षकही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात. जीव धोक्यात घालून मालमत्तेचे अथवा रुग्णलयात सेवा देण्याचे काम करत आहेत. मग त्यांना विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे, तरी त्वरित सुरक्षारक्षकांना विम्याचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुरक्षा पर्यवेक्षक चंद्रकांत गायकवाड, अभिलाष डावरे, गणेश लांडगे, शंभू खंडागळे यांनी केली आहे.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. असेही चंद्रकात गायकवाड यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर