गोल पोस्ट महाराष्ट्र औसा तालुक्यात माझ्या भावाच्या पत्नीला रामराम का केला याचा जाब विचारणाऱ्या ४०वर्षीय...

औसा तालुक्यात माझ्या भावाच्या पत्नीला रामराम का केला याचा जाब विचारणाऱ्या ४०वर्षीय तरूणाचा चाकूने भोसकुन खून

औसा, लातूर ६ जानेवारी २०२४ : माझ्या भावाच्या पत्नीला रामराम का केला याचा जाब विचारणाऱ्या तरूणाचा चाकूने भोसकुन खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील होळी या गावात घडलीय. घरा शेजारीच असलेला आरोपी प्रकाश जाधव हा मयत माधव यादव यांच्या भावाच्या पत्नीला येता जाता रामराम करत असल्याची माहिती माधव यांच्या घरच्यांनी दिली होती. रात्रीच्या सुमारास यादव बंधू याचा जाब विचारण्यासाठी प्रकाश जाधव यांच्या घराकडे गेले. त्यावेळी प्रकाश जाधव यांच्या सह तीन ते चार जणांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार सुरू केले, या जबर हल्ल्यात महादेव यादव याचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यात लहान बंधू संभाजी गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना अटक केली असून मुख्य आरोपी मुख्य आरोपी प्रकाश जाधव फरार झाला आहे. या घटनेने गावात भीतीच वातरवण तयार झालं असून आरोपीला तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी यावेळी मयताच्या कुटुंबीयांनी केलीय.

न्युज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक

error: Content is protected !!
Exit mobile version