गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यात शाळेच्या पाठीमागे आढळले बॉम्ब सहश्य वस्तु, परिसरात खळबळ

पुण्यात शाळेच्या पाठीमागे आढळले बॉम्ब सहश्य वस्तु, परिसरात खळबळ

पुणे २६ जूलै २०२२ : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे‌. पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड आढळून आल्याने पोलीस आणि बॉम्बशोध पथकाने तत्काळ धाव घेऊन ग्रेनेड निकामी केले .

मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील एका स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला आहे. या परिसरात असलेल्या आण्णासाहेब मगर विधाल्याच्या उजव्या बाजुला बॉम्ब सदृश वस्तु आढळून आले होते.

या परिसरात राहणाऱ्या अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी तातडीने पोलीस पाटील अंकुश उंद्रे आणि अशोक आव्हाळे यांना सांगितले. त्यानंतर पोलीस पाटील यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला याची माहिती दिले, खूप वर्षापूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आलेला आहे. ७ ते ८ वर्षापूर्वी त्या टिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे माती वाहुन गेल्यानंतर ग्रेनेड वर आले असावे. बॉम्बशोधक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला आहे. हा ग्रेनेड भरावामध्ये कुठून आणि कसा आला याचा तपास पोलीस करत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version