नीरेत अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

पुरंदर, दि. २ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील निरा येथील एका युवकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. अल्पवयीन मुलगी व तिच्या पालकांनी नीरा पोलीस दुरक्षेत्रात तक्रार दिली आहे. जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती जेजुरी पोलीसांनी दिली आहे.संबंधित युवक फरार असुन अजूनही तो पोलीसांच्या हाती लागला नाही .

निरा शहरात मुलींची छेडछाड होण्याचे प्रमाण मागील काळात घटले होते. निरा – जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दामिनी पथक व मुलींसाठी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून मुलींमध्ये जागृती केली होती. त्यामुळे मागील दोन वर्षापासून छेडछाडीचे प्रमाण घटले होते.

मात्र काल नीरा येथे गुन्हा दाखल झाला. नीरा येथील शाळकरी मुली शाळेत जातेवेळी हा युवक तिची छेडछाड करत असे, अगदी हात धरे पर्यंत यांची मजल गेली होती. शाळा किंवा क्लासला जाताना मुली एकट्या च जात असतात. अशावेळी गल्लीबोळ मध्ये हा युवक या मुलीची छेड काढत असे.काल या युवकाने पुन्हा छेडछाड केल्याने ती मुलगी घाबरून गेली. आज तिने पालकांना याविषयी कल्पना दिल्यानंतर पालकांनी निरा दुरक्षेत्रात तक्रार दिली असून जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या छेडछाड बद्दल बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित युवक हा नीरा प्रभाग चार मधील असून आकाश राजेंद्र झुंजूरके (वय.१९) असे त्याचे नाव आहे. हा युवक कालपासून नीरा येथे दिसून येत नसल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. नीरा पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार राजेंद्र भापकर व सुदर्शन होळकर आरोपी युवकाचा शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा