गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे विना मास्क फिरणाऱ्यांकडून ०१ लाख १९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

विना मास्क फिरणाऱ्यांकडून ०१ लाख १९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

लोणी काळभोर, दि. ०८ सप्टेंबर २०२०: नागरिक मस्कचा वापर करत नसल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हवेली तालुक्यातील संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक ठिकाणी बिगर मास्क भटकणाऱ्या व पान, तंबाखू, गुटखा, खाऊन थुकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता गाडी चालवताना व दुकानांमध्ये आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. यापूर्वीसुद्धा पोलिस प्रशासनाने अशीच कारवाई केली होती.

असे असताना सुद्धा नागरिक मास्क वापरत नसल्या कारणाने लोणी काळभोर पोलिसांनी आज पुन्हा मास्क न वापरता व प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करता फिरणाऱ्या वाहनचालकांवर, दुकांदारावर, पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. मास्क न वापरणाऱ्या प्रत्येक नागरिकावर आपत्ती व्यवस्थापन १८८ कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून ०१ लाख १९ हजार २०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी व पो. ना. राऊत, पो. ना. चांदणे, पो. शी. पारखे, पो. शी. शिंदे, यांनी ही कारवाई केली आहे.

आदेशाचे पालन न केल्यास कारवाई अशीच सुरू राहील. नागरिकांनी बिना मास्क घराबाहेर पडू नये व मास्क लावून घराबाहेर यावे असे बोलताना सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी नागरिकांना आव्हान केले आहे. प्रशासनाचे आदेश मोडणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासन कारवाई करणार असल्याने नागरिकांनी मास्क वापरावेत व विनाकारण बाहेर फिरू नये असे आव्हान लोणीकाळभोर पोलिसांकडून व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version