गोल पोस्ट इतर उल्हासनगरमध्ये खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवरून पडलेल्या व्यक्तीला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले

उल्हासनगरमध्ये खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवरून पडलेल्या व्यक्तीला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले

ठाणे, २२ जुलै २०२३: ठाणे जिल्ह्यात खड्डयांमुळे मोटारसायकलवरून पडलेला एक २३ वर्षीय व्यक्तीला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आज (शनिवारी) ही माहिती दिली आहे.

माहितीनुसार हाजीमालुंग रोडवर गुरुवारी रात्री ११:३० च्या सुमारास हा अपघात झाला ज्यामध्ये ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर विभागाच्या हिल लाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मृत सूरज गवेरी हा खड्डा टाळण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला.

यादरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले, यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक करण्यात आलीय, असे पोलिसांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version