गोल पोस्ट इतर पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात दुकानांना पहाटे लागली भीषण आग, जीवितहानी नाही

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात दुकानांना पहाटे लागली भीषण आग, जीवितहानी नाही

पुणे, १७ ऑक्टोबर २०२२: पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या वेळी दुकानावरील तळमजल्याला आग लागली. आगीचा लोट एवढा होता की आग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरली होती.

यामुळे दुकानातील सर्व वस्तु जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या बावीस जवानांनी तीन बंबांच्या सहाय्याने ही मोटी आग तासाभरात आटोक्यात आणली. मात्र आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही.

फर्ग्यूसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकाजवळ चॅम्पियन स्पोर्ट्स नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये खेळाडूंसाठी साहित्यासह विविध प्रकारच्या वस्तु विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतू आता हे सर्व जळूनखाक झाले आहे.

दरम्यान, ही आग आज सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास लागली असावी असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. आता पूर्णपणे आग विझली असून, जवानांकडून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version