गोल पोस्ट महाराष्ट्र व्यायाम शाळेसाठी लोटांगण घालत दिले निवेदन; बुधगाव येथील तरुणाचा उपक्रम

व्यायाम शाळेसाठी लोटांगण घालत दिले निवेदन; बुधगाव येथील तरुणाचा उपक्रम

चोपडा, २० फेब्रुवारी २०२४ : चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे बस स्थानकावर काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन केले होते. तेव्हा उर्वेश साळुंखे या तरुणाने शिवजयंतीचे औचित्य साधत व्यायाम शाळेच्या मागणीसाठी बस स्थानक ते राममंदिर असे अंतर लोटांगण घालत पार केले. गावात तरुणांसाठी व्यायाम शाळा बांधावी अशी मागणी साळुंखे यांनी तालुक्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आणि बुधगाव येथील संरपच यांच्याकडे केली. या प्रसंगी मोठ्या संख्येने बुधगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version