गोल पोस्ट इतर सिटी बस वळण घेताना चेहरा बाहेर काढलेल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, औरंगाबाद येथील...

सिटी बस वळण घेताना चेहरा बाहेर काढलेल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, औरंगाबाद येथील घटना

औरंगाबाद, १० ऑक्टोबर २०२२ : स्मार्ट सिटी बस सेवेची बस येथील जिल्हा परिषदेच्या आवारामधून वळण घेत असताना चेहरा बाहेर काढलेल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली आहे. हरीओम पंडित वय १४ वर्षे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

साजापूर – औरंगपुरा बस क्रमांक एम एच २०, ९८६२ ही बस आपल्या फेरीची वेळ संपल्यामुळे, जिल्हा परिषदेच्या ग्राउंड वर जात होती. परंतु त्याचवेळी विद्यार्थ्यांचा समज झाला की बस साजापूर कडे निघाली आहे. त्यामुळे तो बस मध्ये जाऊन बसला. यानंतर बस मधून डोके बाहेर काढताच त्याला जिल्हा परिषद मैदानाच्या गेटच्या भिंतीजवळ असलेल्या लोखंडी खांबावर त्याचे डोके आदळून जोराचा मार बसला. त्यामुळे तो जागीच कोसळला. या घटनेनंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version