गोल पोस्ट गुन्हा उरुळीकांचन येथून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त

उरुळीकांचन येथून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त

उरुळी कांचन, ११ जानेवारी २०२१: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उरुळीकांचन येथून एका सराईताकडून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने पुणे जिल्हयात कोबींग ऑपरेशन राबविले होते. त्यासाठी जिल्हा व पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राजेंद्र थोरात, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, विदयाधर निचित, दत्तात्रय तांबे, प्रमोद नवले यांचे पथक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना उरुळीकांचन इलाईट चौक येथे आले असताना त्यांना एका पांढरे रंगाचे ॲक्टीव्हा मोपेडवर पांढरा रंगाचा शर्ट व निळी जीन पॅट घातलेला सोमा कांचन नावाचा इसम कमरेला गावठी पिस्टल लावून उरळीकांचन परिसरातील लोकांमध्ये दहशत करीत फिरत असून तो सध्या उरुळीकांचन कस्तुरी कार्यालयाच्या शेजारी ॲक्टीव्हा गाडीवर उभा आहे.

अशी बातमी मिळाल्याने लगेच सदर गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयास्पद रित्या मिळून आलेला व पळून जाण्याचे तयारीत असलेला इसम नामे सोमनाथ बाळासाहेब कांचन वय ३४ वर्षे रा.उरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस मिळून आले.

सदर मिळालेला मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी सोमनाथ कांचन याने सदर गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले, त्याचा कोठे वापर केला आहे काय, याबाबतचा अधिक पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शना खाली उरुळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड हे करीत आहेत.

आरोपी सोमनाथ कांचन याची उरुळीकांचन परिसरात दहशत असून बऱ्याच लोकांना तो दमदाटी व मारहाण सुद्धा करायचा. परंतु तो स्थानिक असल्याने व त्याच्या भीतीने लोक पोलीसात तक्रार देण्यास धजावत नसत.

काही राजकीय पुढारी अशा लोकांचा निवडणुकीसाठी वापर करून घेतात ही खेदजनक बाब आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version