गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट आज मनिष पांडे अभिनेत्री अश्रिता शेट्टीबरोबर लग्नाच्या बेडीत

आज मनिष पांडे अभिनेत्री अश्रिता शेट्टीबरोबर लग्नाच्या बेडीत

मुंबई: टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मनिष पांडे हा दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत लग्न करणार आहे. २ डिसेंबरला आज या दोघांचं लग्न होणार आहे. मनिष पांडे हा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या टीमचं नेतृत्व करत आहे.
आश्रिता शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंद्रजीत, ओरू कन्नियुम, उड्डयम, एनएच ४ यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. २०१२ साली रिलीज झालेल्या तेलीकेडा बोली या चित्रपटातून अश्रिता शेट्टीने या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मनिष पांडे त्याच्या लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाच बोलावणार आहे. संपूर्ण रिती रिवाजानुसार हे लग्न २ दिवस चालणार आहे. मनिष आणि आश्रिता एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाला काही मित्र आणि नातेवाईक उपस्थित असतील. भारतीय संघ विंडीजविरुद्ध ६ डिसेंबरला मुंबईत पहिला टी२० सामना खेळणार आहे. त्यामुळे काही भारतीय खेळाडू मनिष पांडेच्या लग्नासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मनिष पांडे-अश्रिता शेट्टीआधी विराट कोहली-अनुष्का शर्मा, युवराज सिंग-हेजल कीच, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा, मोहम्मद अजहरुद्दीन-संगीता बिजलानी या क्रिकेटपटू-अभिनेत्रीच्या जोड्यांनी लग्न केलं.

error: Content is protected !!
Exit mobile version