गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक पदी अभिनव देशमुख

पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक पदी अभिनव देशमुख

पुणे, १८ सप्टेंबर २०२०: पुणे जिल्ह ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची बढती होऊन बदली झाल्याने पुण्याला कोणाची नियुक्ती लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. आज कोल्हापूर ग्रामीणचे अधीक्षक अभिनव देशमुख यांची पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.

राज्य सरकारने अधीक्षक दर्जाच्या २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी दिल्यावर पुण्याच्या अधीक्षक पदी देशमुख यांची वर्णी लागली आहे. यापूर्वीचे अधीक्षक यांनी देखील चांगले काम केले होते. त्यांनी स्वइच्छेने गडचिरोलीच्या नक्षलवादी परिसरात काम करण्याची ईच्छा असल्याचे बोलून दाखवले.

अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर ग्रामीण मध्ये काम करत असताना तिथल्या अवैद्य धंद्यांना चांगला चाप दिला होता. कोल्हापूर येथे देशमुख यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते. अभिनव देशमुख हे उस्मानाबाद येथील असून त्यांचे वडील महसूल विभागात नोकरीला होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version