गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे MIT विद्यापीठ विरोधात अभाविप चे तीव्र आंदोलन, विद्यार्थ्यांना अटक

MIT विद्यापीठ विरोधात अभाविप चे तीव्र आंदोलन, विद्यार्थ्यांना अटक

पुणे, २२ जून २०२१ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, कामधंदे ठप्प असल्यामुळे बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत MIT विद्यापीठ  विद्यार्थ्यांकडून स्टडी टूर च्या नावाने लाखो रुपये घेत आहे, या गोष्टीचा अभाविप, पुणे च्या वतीने आज दिनांक २२ जून रोजी तीव्र विरोध करण्यात आला.
MIT विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी विदेश अभ्यास दौरा International Study Tour (IST) आयोजित करते, यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले जातात. परंतु, २०१९-२०२० या बॅचच्या विद्यार्थ्यांचा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय दौरा झालाच नाही. मात्र, विद्यार्थ्यांकडून त्याची  शुल्क पुर्ण प्रमाणात आकारण्यात आली होती.
सध्याच्या परिस्थिती मुळे सर्व पालक वर्ग आधीच हवालदिल झालेला आहे, त्यातच या विद्यार्थ्यांकडून न झालेल्या  आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याची प्रत्येकी २ लाख असे १५०० विद्यार्थ्यांची घेतलेली शुल्क MIT प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांना परत करावी,  अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणी येत आहेत, अशा काळात विद्यार्थ्यांना त्यांची महाविद्यालयीन शुल्क भरणे अवघड वाटत आहे, आणि त्यात आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याच्या नावाने विद्यार्थ्यांची लुट करणे हे कितपत योग्य? असा प्रश्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे यांनी MIT प्रशासनाला विचारला. या विषयाला घेऊन वेळोवेळी अभाविप पुणे चे कार्यकर्ते MIT विद्यापीठासोबत चर्चा करत होते परंतु याचा काही एक फायदा होत नसल्याचे जेव्हा दिसून आले त्यावेळी विद्यार्थी परिषदेने याबाबत ऑनलाईन पद्धतीने विरोध दर्शवला. अनेको विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला परंतु त्याचा देखील काही प्रभाव पडत नसल्याचे दिसून आले.
वैतागलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वापस मिळवून देण्यासाठी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला अखेर आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. आज दिनांक २२ जून २०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे कडून MIT-WPU महाविद्यालय, कोथरूड, पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या हक्काच्या या आंदोलनात अभाविप पुणे चे महानगर मंत्री शुभम भुतकर, प्रदेश सह मंत्री अनिल ठोंबरे यांच्या सह १५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड
error: Content is protected !!
Exit mobile version