गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट सूर्यकुमार यादवच्या मते हा अभिनेता बायोपिकमध्ये त्याचे पात्र साकारू शकतो

सूर्यकुमार यादवच्या मते हा अभिनेता बायोपिकमध्ये त्याचे पात्र साकारू शकतो

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२२ : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू दिवसेंदिवस उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने देखील अप्रतिम खेळाने सर्वांचेच मन जिंकले आहे. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा त्याचे कौतुक करीत आहे. सूर्यकुमार यादव मैदानात उतरला की भलेभले गार होतात, असं क्रिकेटप्रेमींचे म्हणणं आहे. सूर्यकुमार यादव हा आता विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज फलंदाजांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघातील या खेळाडूने त्याच्या खेळातून अनेक चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. त्याच्याकडून क्रिकेट रसिकांना आता बऱ्याच अपेक्षा आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सूर्यकुमारने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच जर तुझ्यावर बायोपिक आला तर त्यात तुझी भूमिका कोणी साकारावी, असे तुला वाटते? या प्रश्नाचे सूर्यकुमार यादवने उत्तर दिले आहे. मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने सूर्यकुमार यादवची भूमिका केली तर त्याला नक्कीच आवडेल असे त्याने सांगितले.

श्रेयस तळपदे यानी यापूर्वी एक ‘इक्बाल’ आणि ‘कौन प्रवीण तांबे’ असे हे चित्रपट दिले आहेत. इक्बाल चित्रपटातून क्रिकेटपटू होण्याची इच्छा असलेल्या कर्णधार मुलाची भूमिका श्रेयस तळपदेने साकारली होती. त्यामुळे श्रेयस तळपदेला क्रिकेटमधील भूमिका उत्कृष्टपणे साकारता येऊ शकते. सूर्यकुमार यादवच्या बायोपिकसाठी श्रेयस तळपदे एक योग्य निर्णय ठरू शकतो, असे चाहत्यांचेही म्हणणे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

error: Content is protected !!
Exit mobile version