गोल पोस्ट महाराष्ट्र जालना तालुक्यातील नेर येथे गुटखा विक्रेत्यावर कारवाई

जालना तालुक्यातील नेर येथे गुटखा विक्रेत्यावर कारवाई

जालना, ९ एप्रिल २०२४ : जालना तालुक्यातील नेर येथील अरबाजखान अयुबखान पठाण (वय 21) हा राहत्या घरात गुटखा साठवून, त्याची चोरट्या मार्गाने विक्री करीत असल्याची माहिती मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सपोनि. घुगे यांनी काल दुपारी अरबाज खान याच्या घरावर अचानक धाड टाकून कारवाई केली आहे.

यावेळी अरबाज खान याच्या घरात अवैधरित्या साठवलेला गुटख्याचा साठा आढळून आला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा १००० गुटखा आणि गोवा १००० पान मसाला असा एकूण २३ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन खरात यांच्या मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version