गोल पोस्ट महाराष्ट्र पुण्यासह ७ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

पुण्यासह ७ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

पुणे, २७ डिसेंबर २०२२: पुणे शहारातील हडपसर येथे झालेल्या बेकायदा दस्तनोंदणीचे लोण राज्यभर पसरले आहे. या प्रकरणी पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडाळात दिली. आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, माधूरी मिसाळ सिद्धार्थ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

पुढे ते म्हणाले, ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत तुकडेबंदी कायदा आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन होत आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाच्या बोगस ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे दहा हजार ६३५ मालमत्तांची बेकायदा दस्तनोंदणी केल्याची बाब आहे. शहरात तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करुन दस्तनोंदणी करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

  • संपूर्ण राज्यात बेकायदा दस्तनोंदणी, गैरव्यवहार सुरु

पुण्यासह ठाणे, नाशिक (सिन्नर,बागलाण,निफाड), औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी अशा सात जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची बेकायदा दस्तनोंदणी, गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे, असेही महसुलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version