गोल पोस्ट महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल अभिनेत्री प्रार्थना बहिरेनी मागितली माफी

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल अभिनेत्री प्रार्थना बहिरेनी मागितली माफी

उदगीर २० फेब्रुवारी २०२४ : मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बहिरे यांना छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणे चांगलेच महागात पडलेय. प्रार्थना यांना उदगीरमध्ये नव्याने सुरु झालेल्या किसान फॅशन मॉलच्या उद्घाटनासाठी बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्घाटनासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे देखील उपस्थतीत होते.

यावेळी शिवरायांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना अभिनेत्री बहिरे यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे शिवभक्तांनी तीव्र संताप व्यक्त करत मॉल समोरील लावलेले बॅनर फाडले आणि त्यांना माफी मागण्याची मागणी केली. सदर प्रकारानंतर अभिनेत्री यांनी व्हिडिओ संदेशे्वाद्वारे माफी मागत चुकून वक्तव्य झाल्याचं त्यांनी मान्य केलय.

न्युज अनकट प्रतिनीधी : महादेव रोडगे

error: Content is protected !!
Exit mobile version