गोल पोस्ट आरोग्य अभिनेत्री ऋतुजा बागवे झाली क्वांरनटाईन, तर शिवसेनेच्या अमदाराचा कोरोना अहवाल पाॅजिटिव्ह….

अभिनेत्री ऋतुजा बागवे झाली क्वांरनटाईन, तर शिवसेनेच्या अमदाराचा कोरोना अहवाल पाॅजिटिव्ह….

मुंबई, दि. २१ जुलै २०२०: कोरोनाने सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटी राजकारणी यांच्या घरात शिरकाव करायला सुरवात केली आहे तर त्या पाठोपाठ अनेक जणांनी त्यावर यशस्वी मात देखील केली आहे.

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे विलगीकरणात

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यामुळे तीेने स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. काही दिवसापुर्वी तिच्या वडिलांचा अहवाल हा कोरोना पाॅजिटिव्ह आल्यामुळे तिने हा खबरदारीचा उपाय घेतला आहे. त्याबरोबरच तिने वडिलांना भावनिक साद घातली असून ” बाबा लवकर बरे होऊन घरी या ” असे लिहीले आहे.

 

शिवसेनेचे नेते कोरोनाच्या विळख्यात…

शिवसेनेच्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील दिवसात आमदार नरेंद्र दराडे यांना लागण झाली होती तर आता आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली आसून त्यांचा कोरोना अहवाल हा पाॅजिटिव्ह आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपाचार सुरु आहेत.


न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version