गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे विभागात अन्नधान्य, भाजीपाल्याचा पुरेसा साठा: डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागात अन्नधान्य, भाजीपाल्याचा पुरेसा साठा: डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे, दि. २६ एप्रिल २०२० : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुणे विभागात अंदाजे ३ हजार ५१५ क्विंटल अन्नधान्याची तर १० हजार २४२ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. तसेच १ हजार ८८९ क्विंटल फळांची आणि २८७ क्विंटल इतकी कांदा-बटाटयाची आवक झाली आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागात २५ एप्रिल २०२० रोजी ९८.३३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २४.११ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत १५४ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत ३९९ कॅम्प असे पुणे विभागात एकुण ५५३ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये ३९ हजार ७३४ स्थलांतरित मजूर असून १ लाख १२ हजार १९० मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version