गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा संथ सुरुवातीनंतर ‘फुकरे ३’ने घेतला वेग, चित्रपटाची कमाई ५० कोटींच्या पुढे

संथ सुरुवातीनंतर ‘फुकरे ३’ने घेतला वेग, चित्रपटाची कमाई ५० कोटींच्या पुढे

मुंबई, ३ ऑक्टोंबर २०२३ : पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, पंकज त्रिपाठी आणि रिचा चढ्ढा स्टारर चित्रपट ‘फुकरे ३’ २८ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच सुस्त दिसत होता. मात्र तिसऱ्या दिवशी अचानक या चित्रपटाने वेग घेतला आणि पाच दिवस पूर्ण होऊन ५० कोटींचा टप्पा पार केला.

मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे ३’ मधील पंकज त्रिपाठी आणि वरुण शर्मा यांची कॉमेडी लोकांना आवडते. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ₹८.८२ कोटी, दुसऱ्या दिवशी ₹७.८१ कोटी, तिसऱ्या दिवशी ₹११.६७ कोटी आणि चौथ्या दिवशी ₹१५.२५ कोटींची कमाई केली. भारतात, ‘फुकरे ३’ ने रिलीज झाल्यापासून ₹५४.९८ कोटींची कमाई केली.

‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते २०१३ आणि २०१७ मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. जफर भाई म्हणजेच अली फजलने यापूर्वीच्या दोन्ही फ्रँचायझींमध्ये काम केले होते, परंतु यावेळी चित्रपटात त्याची भूमिका कॅमिओ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version