गोल पोस्ट महाराष्ट्र अनिकेत तटकरे यांच्या पाठोपाठ सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या साधर्म्य व्यक्तीकडून उमेदवारी अर्ज...

अनिकेत तटकरे यांच्या पाठोपाठ सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या साधर्म्य व्यक्तीकडून उमेदवारी अर्ज दाखल

रायगड, १९ एप्रिल २०२४ : राष्ट्रवादीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या बरोबरच डमी अर्ज म्हणून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज सुनील तटकरी यांच्या नावाचे साधर्म्य असलेले सुनील दत्ताराम तटकरी यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नामसाधर्म्य व्यक्ती रायगडच्या लोकसभेत उतरवणे ही आता नवीन गोष्ट राहिली नसुन विरोधकांकडून ही खेळी होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र २२ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असून त्यानंतर रायगड लोकसभेच्या लढतीची वस्तुस्थिती समोर येणार आहे आणि किती अधीकृत उमेदवार रिंगणात राहतील? हे पाहण्यासारखे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर

error: Content is protected !!
Exit mobile version