गोल पोस्ट इतर राजकारण प्रिया बेर्डे पाठोपाठ सविता मालपेकर ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

प्रिया बेर्डे पाठोपाठ सविता मालपेकर ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

मुंबई, २१ जुलै २०२० : काही दिवसापुर्वीच प्रिया बेर्डेने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता आता तीच्या पावलावर पाऊल टाकत आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सविता मालपेकर.

सविता मालपेकर या आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ त्यांच्या हाती बांधतील. त्यांच्यासोबतच गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे तीन कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

सविता मालपेकर या मराठीतल्या अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मूळशी पॅटर्न, काकस्पर्श या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. तसंच गाढवाचं लग्न या नाटकातली गंगी ही भूमिकाही त्यांनी उत्तमरित्या साकारली आहे.

मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version