गोल पोस्ट महाराष्ट्र आजित पवार हेडमास्तर, तुम्ही कार्यकर्त्यानां धीर द्या…..

आजित पवार हेडमास्तर, तुम्ही कार्यकर्त्यानां धीर द्या…..

मुंबई, दि. २६ जुलै २०२०: राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर नेहमीच जोरदार टीका केली जाते. नितेश राणे नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काही ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. अजित पवार हेडमास्तर आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडून काहीतरी शिकावे उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेते संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत मी इथेच आहे. सरकार पाडून दाखवा असे म्हटले होते यालाही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करताय कोण म्हणतंय सरकार पाडणार? आम्ही कुणीच म्हणत नाही म्हणून आम्ही बाहेर फिरत आहोत. पोटदुखी झाली असेल तर त्यांना झाली असेल, म्हणून त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत, अशी टीकेची झोडच चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर उठवली. त्या बरोबरच पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आसताना त्यांनी आघाडी सरकारवर हे निशाणे साधले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version