गोल पोस्ट महाराष्ट्र बदनापूर तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रमात महाशिवरात्र महोत्सव सोळयानिमीत्त अखंड हरीनाम सप्ताह

बदनापूर तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रमात महाशिवरात्र महोत्सव सोळयानिमीत्त अखंड हरीनाम सप्ताह

बदनापूर, जालना ६ मार्च २०२४ : जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रमात महाशिवरात्र महोत्सव सोळयानिमीत्त अखंड हरीनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा आणि शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळयाचे २ मार्च पासून आयोजन करण्यात आले आहे. प.पु.ब्रम्हलीन नागाबाबा यांच्या आशिर्वादाने व प.पु.बालयोगी खडेश्वरी बाबा यांच्या प्रेरणेने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून हे या सोहळ्याचे पंचवीसावे वर्षे आहे.

या सेाहळयात विविध धार्मीक कार्यक्रम होत असून समाज प्रबोधन व सामाजिक उपक्रम राबवत प्रभू श्रीराम मंदिराचा जिर्णोध्दारतून त्रिवेणी संगम साधला जात आहे. सोहळयाला महराष्ट्रातील नामवंत संत, महंत उपस्थित राहून किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहे. सोहळयात रक्तदान शिबीराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळयात धार्मीक कार्यक्रम, समाजप्रबोधन, सामाजिक उपक्रम राबवून त्रिवेणी संगम साधण्यात येत आहे. सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version