गोल पोस्ट शैक्षणीक पुणे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवा : जिल्हाधिकारी

पुणे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवा : जिल्हाधिकारी

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या आहेत.पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणुमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत यापूर्वीच आदेश काढण्यात आले आहेत.
याशिवाय महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, शहरालगतच्या जवळपास असलेल्या अशा मोठ्या शैक्षणिक संस्था देखील ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत सुचित करण्यात आले.
ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद, सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था ह्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वरील सर्वच क्षेत्रात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या अनुषंगाने १० व १२ वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षांसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असून त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित संस्था प्रमुखास देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version