गोल पोस्ट महाराष्ट्र जालन्यात ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संस्थेचा डॉ.कल्याण काळे यांना पाठिंबा

जालन्यात ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संस्थेचा डॉ.कल्याण काळे यांना पाठिंबा

जालना २८ एप्रिल २०२४ : जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांना ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अंसारी यांनी पाठींबा दिलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे जालना दौऱ्यावर असताना त्यांनी शब्बीर अहमद अन्सारी यांची भेट घेतली.

यावेळी अन्सारी यांनी काळे यांना उमेदवारी जाहीर झाल्या बद्दल त्यांना शुभेच्छा देत लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पाठिंबा जाहीर केलाय. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी माजी आमदार नामदेवराव पवार, ग्रामिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, राजेंद्र राख यांच्या सह महाविकास आघडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version