पुणे : सध्या आपल्या देशात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. या संकटाचा सामना प्रत्येक व्यक्ती, शासन, स्वयंसेवी संस्था, करत आहेत. यावेळी खरी गरज आहे ती योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीला, योग्य मदत पोहोचवण्याची.
“विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नसून तो आजचा नागरिक आहे” म्हणून अभाविप सुध्दा या कार्यात स्वाभाविक पणे सहभागी झाली आहे.
अभाविप पुणे महानगर व डिक्की संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या संकटात समाजासाठी आपला खारीचा वाटा म्हणून गरजू विद्यार्थ्यांना व कुटूंबाना किट देण्याची योजना सुरू केली आहे.
यामध्ये पीठ, तांदूळ, डाळ, तेल, मसाला, तिखट, मीठ ई. अश्या जीवनावश्यक भोजन सामग्री आहे. तसेच पुणे शहरात गरजू विद्यार्थी व कुटुंबाला जर कोणती मदत लागत असेल तर ८०८७५५८५५८ / ७२७६५७३७३७ या ध्वनी क्र. संपर्क करावा असे आवाहन या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी- प्रगती कराड
