गोल पोस्ट महाराष्ट्र पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट १५ दिवसांकरिता बंद

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट १५ दिवसांकरिता बंद

रायगड, २९ जुलै २०२३ : जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आजपासून पुढील १५ दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी प्रसिद्ध केली आहे.

आंबेनळी घाट रस्ता हा अरुंद व घाट वळणाचा रस्ता वळणाचा आहे. रस्त्याच्या बाजूला असणारा डोंगरकडा अतिवृष्टीमुळे कोसळून डोंगरावरील माती व मोठमोठे दगड रस्त्यावर येतात. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरला आहे. या रस्त्यावरुन वाहतूक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात यावा, पर्यायी रस्ता पोलादपूर खेड-चिपळून-पाटण-कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा पर्यायी मार्ग सुरू ठेवावा असा अहवाल रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. त्या अनुषंगाने हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे अशी माहिती समोर येतेय.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version