गोल पोस्ट महाराष्ट्र श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील म्हसळा शहरात काढण्यात आली जनजागृती रॅली

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील म्हसळा शहरात काढण्यात आली जनजागृती रॅली

रायगड, २३ मार्च २०२४ : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर होताच लोकसभा उमेदवारासह प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार कोकणातील ३२ रायगड लोकसभा मतदार संघासाठी निवडणुकीची घोषणा ही तिसऱ्या टप्प्यात होणार असून यंदा या निवडणुकीत मतदान टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत आज १९२ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील म्हसळा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे आणि प्रांताधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. यावेळी या रॅलीत तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, मंडळ अधिकारी सलीम शहा यांसह अन्य अधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर

error: Content is protected !!
Exit mobile version