गोल पोस्ट महाराष्ट्र अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला असिस्टंट कमांडंट

अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला असिस्टंट कमांडंट

कोल्हापूर, ८ ऑगस्ट २०२३ : नवे पारगाव येथील प्रशिक सुरेश कांबळे यांची , संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलात घेण्यात आलेल्या सन २०२२ च्या परीक्षेतून असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली. त्यांनी देशातून १५५ व्या रॅकने यश संपादन केले. प्रशिकचे शालेय शिक्षण वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी तर महाविद्यालयीन शिक्षण वारणा महाविद्यालयात झाले आहे.

सन २०१९ पासून त्याने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास चालू केला. सध्या मुंबई येथील लाॅ कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काका जयपाल कांबळे, आई-वडील, गुरुजन यांच्या मार्गदर्शनातून आपली वाटचाल यशस्वी झाल्याचे प्रशिकनी सांगितले. आई प्रज्ञा कांबळे नवे पारगाव अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत आहे तर वडील सुरेश कांबळे हे खाजगी कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करतात. आज गावात त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version