नागपूर, ११ सप्टेंबर २०२१: नागपुरातील खापरखेडा येथील चनकापूरमध्ये भीषण घटना घडली आहे. सरावासाठी मैदानावर आलेल्या दोन खेळाडूंचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण गंभीर झाला आहे. झालेल्या खेळाडूंमध्ये एक धावपटू तर दुसरा फुटबॉलपटू आहे. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे मृतांचे शरीर पूर्णपणे भाजले. यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा येथील चनकापूर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. तन्मय दहीकर आणि अनुज कुशवाह अशी मृतांची नावे आहेत.
खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तन्मय आणि अनुज यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाईल, अशी माहिती सावनेरचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील चनकापूर येथे खुलै मैदान आहे. या मैदानावर खेळाडून नियमित सरावासाठी येतात. येथे काही खेळाडू धावण्याचा सरावर करतात तर काही खेळाडू क्रिकेट, फुटबॉल असे खेळ खेळतात. काल (१० सप्टेंबर) बरेच खेळाडू चनकापुरातील मैदानावर जमले होते. यावेळी अचानकपणे आकाशात काळे ढग जमा झाले तसेच पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे पाऊस आल्यामुळे खेळाडू मैदानावर असलेल्या शेडकडे धावले. यावेळी मृत अनुज आणि तन्मय हे मागे मैदानावरच राहिले. दोघेही सोबतच शेडकडे धावत होते. मात्र यावेळी त्यांच्या अंगावर अचाकनपणे वीज कोसळली. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर सक्षम गोठीफोडे नावाचा खेळाडू यामध्ये गंभीर जखमी झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे