गोल पोस्ट महाराष्ट्र कृषी माल साठवणुकीसाठी गोदाम बांधकामकरीता अर्ज सादर करावेत

कृषी माल साठवणुकीसाठी गोदाम बांधकामकरीता अर्ज सादर करावेत

जालना १४ जुलै २०२४ : केंद्र पुरस्कृतअन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य सन २०२४-२५ अंतर्गत स्थानिक पुढाकार बाबीमध्ये जिल्ह्यात कमाल २५० मेट्रिक टन साठवणुकीच्या गोदाम बांधकामासाठी भौतिक ४चा लक्षांक प्राप्त आहे. प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत आहे. इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ कंपनी FPO/FPC) यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे.

बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदारास अनुदान अनुदेय आहे. सदर बाबीसाठी इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ / कंपनी FPO/FPC) महाराष्ट्र राज्य वखार महांडळच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिजाईन, स्पेसिफिकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रके आवश्यक राहील. सदर बाबीचा अर्ज/प्रस्ताव माहे ३१ जुलै २०२४ अखेर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावेत. गोदाम बांधकाम सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक राहील. तसेच गोदामाचा वापर शेतक‌ऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी माल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारून करावा.

या बाबत १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटाराईज्ड हमी पत्र देणे बंधनकारक आहे. लक्षांकाच्या तुलनेत अर्ज जास्त आल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हातील शेतकरी उत्पादक संघ कंपनी FPO/FPC यांनी अधिक माहिती साठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे कापसे, यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version