गोल पोस्ट महाराष्ट्र न्यायालयापेक्षा तुम्ही मोठे आहात का? आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली टीका

न्यायालयापेक्षा तुम्ही मोठे आहात का? आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली टीका

सातारा, ३० जुलै २०२३: साताऱ्यात खिंडवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेवर जनावरांचा आठवडी बाजार भरवण्यात आला आहे. यांचे उद्धाटन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं की अडवायचं. काम होऊन द्यायचं नाही, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पेक्षा तुम्ही मोठे आहात का? देशात लोकशाही आहे. असल्या गोष्टींना कोण भीक घालत नाही.

भिडे गुरुजी यांनी केलेले विधान चुकीचे आहे. कोणत्याही महापुरुषांबद्दल असे विधान करणे चुकीचे आहे. सर्वांनी महापुरुषांबद्दल बोलताना स्वतःला आवरलं पाहिजे असे सांगत भिडे गुरुजींनी केलेल्या विधानावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version