गोल पोस्ट क्रीडा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून खेळणार….

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून खेळणार….

मुंबई, १९ फेब्रुवरी २०२१: आयपीएलचा १४ वा हंगाम लवकरच सुरू होत आसून, क्रिकेटप्रेमी या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. तर आयपीएलच्या १४ व्या सीझनसाठी खेळाडूंची लिलाव सत्र सुरू आहे. तसेच या मधे अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळते आणि त्यांच्यावर प्रत्येक संघाचे बारीक लक्ष असते.

त्यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर वर अनेक चाहत्यांची नजर होती. या सीजनसाठी अर्जुन तेंडुलकरने स्वताची २० लाख बेस प्राईज लावत या लिलावासाठी उतरला होता आणि अखेर त्याला एका संघाने स्थान दिले आहे.

आधी पासूनच सोशल मिडियावर अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स हा संघ घेईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि तो खरा पण झाला.अर्जुन तेंडुलकरला त्याचा बेस प्राईज २० लाखात खरेदी केले.दरम्यान तो आता मुंबई इंडियन्स संघातून खेळताना दिसणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version