गोल पोस्ट महाराष्ट्र चित्रपट, नाटक क्षेत्रातील ‘आर्यन्स सन्मान’चे नामांकन आज जाहीर होणार, ‘आर्यन्स नवदुर्गा’ या...

चित्रपट, नाटक क्षेत्रातील ‘आर्यन्स सन्मान’चे नामांकन आज जाहीर होणार, ‘आर्यन्स नवदुर्गा’ या पुरस्काराचेही वितरण

पुणे २७ नोव्हेंबर २०२४ : सालाबाद प्रमाणे यावर्षीच्या मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रातील विविध गोष्टींसाठी दिला जाणाऱ्या ‘आर्यन्स सन्मान’चे नामांकन आज जाहीर होणार आहे. ‘आर्यन्स सन्मान’चे हे दुसरे वर्ष असून पुण्यातील डीपी रोडवरील केशवबाग या ठिकाणी हा नामांकन सोहळा आज संध्याकाळी होणार आहे. अनेक नामांकित चित्रपट आणि नाटकांमध्ये वेगवेगळ्या विभागात चुरस असल्याचे परीक्षक तसेच आयोजकांकडून सांगण्यात आलय.

‘आर्यन्स सन्मान’च्या आधी ‘आर्यन्स नवदुर्गा’ या पुरस्काराचेही वितरण आज होणार आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ महिलांना ‘आर्यन्स नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सिस्टर लूसी कुरियन, आरती बनसोडे, ज्योती सचदे, तेजस्वी सेवेकरी, ताराबाई पवार, अहिल्या बर्डे, सायली पिलाने, पूजा धुरी, आदिती गोपीचंद स्वामी या नवदुर्गांना यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘आर्यन्स नवदुर्गा’ पुरस्काराने गौरवले जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version