गोल पोस्ट महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बदल्या…

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बदल्या…

जालना, १७ जानेवारी २०२४ : छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

जालना जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षक यांच्या बीड जिल्ह्यात, दहा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हयाबाहेर आणि आठ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहेत. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांची बीड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तर जालना येथे धाराशिव येथील पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि संभाजीनगर येथील पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांचीही बदली करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version