गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच आशिष नेहरा ट्रेंडिंग मध्ये

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच आशिष नेहरा ट्रेंडिंग मध्ये

पुणे, २५ ऑक्टोबर २०२२ : भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. सुनक यांनी इतिहास रचला आहे ते पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. जे इंग्लंडच्या पंतप्रधानपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता जगभरातून सुनक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

पण भारतात मात्र वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने भारतात आशिष नेहरा ट्रेंड होत असल्याचं पाहायला मिळतंय.

सोशल मीडियावर ऋषी सुनक यांचं अभिनंदन करतानाच आशिष नेहरा नाव घेतलं जात आहे. याला कारण आहे ते ऋषी सुनक आणि आशिष नेहरा यांच्या चेहऱ्यात अनेकांना साम्य आढळून आलंय. सुनक हे टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आशिष नेहरा सारखे दिसतात. असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर काहीजण कोहिनूर परत आणण्याची मागणी करत आहेत. तर काही लोकांनी ऋषी आणि आशिष यांना कुंभमेळ्यात वेगळे झालेले भाऊ असे सांगितले .ऋषी सुणक मिम्सने सोशल मीडिया तुडुंब भरला आहे त्यातील काही मजेदार मिम्स

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version