गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीवर अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे यांची नियुक्ती

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीवर अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे यांची नियुक्ती

मुंबई, १ डिसेंबर २०२२ : बीसीसीआने गुरुवारी आपल्या क्रिकेट सल्लागार समितीची निवड केली आहे. या समितीमध्ये भारताचे माजी खेळाडू अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

बीसीसीआयने ही घोषणा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज (दि. 1 डिसेंबर) रोजी केली. या समितीवर भारताच्या वरिष्ठ पुरूष संघाच्या निवडसमिती सदस्यांची नियुक्ती करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

नव्या तीन सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समितीतील अशोक मल्होत्रा यांनी ७ कसोटी आणि २० वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तर जतीन परांजपे यांनी भारताकडून ४ वनडे सामने खेळले आहेत. सुलक्षणा नाईक यांनी आपल्या ११ वर्षाच्या कारकिर्दित भारतीय महिला क्रिकेट संघाकडून २ कसोटी ४६ वनडे आणि ३१ टी-२० सामने खेळले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version