गोल पोस्ट महाराष्ट्र साताऱ्याच्या जावळी मधील कुडाळ मध्ये एका बेकरी केक शॉप मध्ये राडा

साताऱ्याच्या जावळी मधील कुडाळ मध्ये एका बेकरी केक शॉप मध्ये राडा

जावळी, सातारा ४ ऑगस्ट २०२४ : साताऱ्याच्या जावळी मध्ये एका बेकरीमध्ये केकच्या पैशाच्या देवाणघेवाणी वरून झालेल्या वादात बेकरीची तोडफोड करण्यात आलीय.

यामध्ये दुकानदाराचे मोठे नुकसान झाले असुन काहींनी दहशत माजवत काचा फोडत दुकानातील रोख रक्कम सुद्धा लंपास केलीय.

याभागात लाईट गेल्यामुळे नागरिक त्रस्त होते. लाईट नसल्याचा फायदा घेत काहींनी हा राडा केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यातच कुडाळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी लाईट नसल्याने स्टेशनला कुलूप लाऊन गेल्याचे समोर आले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version