गोल पोस्ट महाराष्ट्र बेळगाव जिल्ह्यातील हिरेकोडी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने ८५ जण अत्यवस्थ

बेळगाव जिल्ह्यातील हिरेकोडी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने ८५ जण अत्यवस्थ

चिकोडी, बेळगाव २९ ऑगस्ट २०२३ : लग्न सोहळ्यातील जेवणातून विषबाधा झाल्याने सुमारे ८५ हून अधिक जण अत्यवस्थ झाले आहेत. ही घटना चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथे घडली. यातील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याने ६५ रुग्णांना चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात आणि मिरजसह अन्य ठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिरेकोडी येथे सोमवारी संध्याकाळी झाकीर पटेल यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यास हिरेकोडी गावासह, मिरज व इतर गावांतील नातेवाईक उपस्थित होते. जेवण आटपून नातेवाईक आपआपल्या घरी परतले. त्यांना आज सकाळी उलटी व जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ६७ जणांवर चिकोडी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिरज येथील नातेवाईकांना देखील आज सकाळी हाच त्रास झाल्याने त्यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिरेकोडी गावाला डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तर चिकोडी सरकारी रुग्णालयात आमदार गणेश हुक्केरी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version