गोल पोस्ट क्रीडा बॅडमिंटन बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

बंगळुरू, १७ जुलै २०२० : अर्जुन पुरस्कारप्राप्त आणि निपुण पॅरा बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे गुरुवारी बेंगळुरू येथील रुग्णालयात कोरोनाव्हायरसमुळे निधन झाले,अशी पॅरा-बॅडमिंटन इंडियाचे अध्यक्ष एन सी सुधीर यांनी माहिती दिली.

आज दुपारी रमेश टिकाराम यांचे निधन झाल्याची माहिती देऊन आम्ही दिलगीर आहोत …” सुधीर यांनी निवेदनात म्हटले आहे सुत्रांशी बोलताना ते म्हणाले की, ताप आणि खोकला झालेल्या ५१ वर्षीय खेळाडूला २९ जून रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या खेळाडूच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत असे सुधीर यांनी सांगितले.

२००१ मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन स्पर्धा देशात आणण्यासाठी टीकाराम महत्त्वपूर्ण ठरले असे टिकाराम यांचा एक मित्र के वाय वेंकटेश म्हणाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version